Janmashtami 2024 Iscon Temple Patna Police Lathi Charge : संपूर्ण देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच जगभरातील इस्कॉन मंदिरातही जन्माष्टमी साजरी केली जात आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. जन्माष्टमीनिमित्त या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम चालू आहेत. दरम्यान, बिहारची राजधानी पाटणा येथील इस्कॉन मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या मंदिरात सोमवारी संध्याकाळपासूनच भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. भाविकांची इतकी गर्दी झाली की मंदिर परिसरात चेंगराचेंगरी सुरू झाली. परिणामी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंदिर परिसरात अजूनही इतकी गर्दी आहे की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी, गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे. हाताबाहेर जात असलेली परिस्थिती पाहता अधिकाऱ्यांनी अधिक पोलीस पथकांना पाचारण केलं आहे.

हे ही वाचा >> Cow Meat Smuggling Suspect Died: …आणि जमावानं पोलिसांची आख्खी तुकडीच ठेवली ओलीस, केली धक्काबुक्की; उत्तराखंडमध्ये गोमांस तस्करीच्या आरोपावरून जमाव संतप्त!

अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला

श्रीकृष्णाचे भक्त जगभर पसरले आहेत. भारतासह जगभरात श्रीकृष्णाला समर्पित शेकडो इस्कॉन मंदिरं आहेत. जन्माष्टमीनिमित्त ही मंदिरं देखील सजली आहेत. जन्माष्टमीचं औचित्य साधून कान्हाच्या हजारो भक्तांनी या मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पाटण्यातील इस्कॉन मंदिरात इतकी गर्दी झाली की मंदिर परिसरात चेंगराचेंगरी सुरू झाली होती. परिणामी मोठा अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे गर्दी पांगवण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आलं आहे. मात्र लाठीचार्ज व धावपळीत अनेक भाविकांना दुखापत झाली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक पोलीस फौजफाटा बोलावला आहे.

हे ही वाचा >> Kolkata Rape and Murder : ‘संजय रॉयने डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याआधी गर्लफ्रेंडला मागितले न्यूड फोटो आणि..’, काय माहिती आली समोर?

पोलिसांचं स्थितीवर नियंत्रण, पोलीस अधीक्षकांची माहिती

लाठीचार्जनंतर भाविक इकडे-तिकडे पळू लागले. भाविकांच्या वस्तू, चपला, हार, फुलं तिथेच पडली. या धावपळीत काही भाविकांना दुखापत झाली आहे. दरम्यान, या लाठीचार्जवर स्पष्टीकरण देताना वरीष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले, मंदिर परिसरात खूप गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांची अधिक कुमक बोलावण्यात आली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी या स्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janmashtami 2024 stampede like situation patna iscon temple police lathi charge asc