Japan Earthquake : जपानच्या नैऋत्ये भागात आज (सोमवारी) ६.९ तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले. जपानच्या हवामानशास्त्र विभागाने सोमवारी यासंबंधीची माहिती दिली आहे. तसेच भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जापानमध्ये त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
स्थानिक वेळेनुसार रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी भूकंप झाला. यानंतर जापानच्या क्युशू(Kyushu) च्या नैऋत्य बेटावर भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या मियाझाकी या भागाला तसेच जवळच्या कोची प्रांताला देखील त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
त्सुनामीच्या लाटा तीन फुटांपर्यंत असू शकतात त्यामुळे यासाठी जापानची हवामानशास्त्र विभागाने (JMA)ने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत .
युनायटेड स्टेट जीओलॉगीकल सर्व्हे या संस्थेने भूकंपाबद्दल आपला सुधारित अंदाज ६.९ वरून खाली घेऊन येत या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नसल्याचे म्हटले आहे. तर जेएमएने तरीही नागरिकांना समुद्राच्या लाटांपासून दूर राहण्याचा आवाहन केले आहे.
सुनामीच्या लाचा लागोपाठ धडकू शकतात. कृपया समुद्रात किंवा समुद्द किनाऱ्यांवर जाऊन नका असे त्यांच्याकडून एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
हेही वाचा>> “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर इकता न्यूक्लीयर पॉवर प्लँटमध्ये कोणतीही गडबड झाल्याची नोंद नाही. तसेच या भूकंपामुळे कोणती जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
रिंग ऑफ फायर वर स्थित असल्याने जापानमध्ये सतत भूकंप होत असतता.