Shinzo Abe Death News : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. पोलिसांनी शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला घटनास्थळावरच अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता आपण असामाधानी असल्यानेच हल्ला केल्याचं त्याने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; पाच तास मृत्यूशी अयशस्वी झुंज

स्थानिक प्रसारमाध्यमांनी पोलीस सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने आपण शिंजो आबे यांच्यावर असामाधानी होतो, त्यामुळे त्यांची हत्या करण्याची इच्छा होती असा खुलासा केला आहे.

कोण आहे हल्लेखोर?

पोलिसांनी गोळीबार होताच ४१ वर्षीय हल्लेखोराला अटक केली. त्याचं नाव Tetsuya Yamagami आहे. हल्लेखोर निवृत्त लष्करी अधिकारी असल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

PHOTOS: भाषण, गोळ्यांचा आवाज, धूर अन् धावपळ…; शिंजो आबेंच्या हल्लेखोराला पकडलं ‘तो’ क्षण

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने गोळी झाडली तेव्हा तो शिंजो आबे यांच्या मागे फक्त १० फूट अंतरावर उभा होता. भाषण सुरु असतानाच गोळी लागल्यानंतर शिंजो आबे खाली कोसळले. यानंतर पोलिसांनी हल्लोखोराला तिथेच पकडलं. रिपोर्टनुसार, त्याने घरामध्ये तयार केलेल्या बंदुकीचा वापर केला.

नेमकं काय झालं होतं –

पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६७ वर्षीय आबे भाषण देत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आबे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टारांनी अनेक प्रयत्न करुनही त्यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज पाच तासांनी संपली. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी म्हणजेच हल्ल्यानंतर दोन तासांनी आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती नारा मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.

आबे यांच्या मानेजवळ गोळी लागली होती. त्यांच्या शरीरावर गोळीमुळे झालेल्या दोन जखमा होत्या. अती रक्तस्त्राव झाल्याने आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japan former prime minister shinzo abe death shooter tells police was dissatisfied sgy