देशाबाहेर प्रवास करायचा असेल तर आपल्याला पासपोर्टची गरज भासते. सर्व देशांमध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल आहे, म्हणजे कोणत्या देशाचा पासपोर्ट असेल तर जास्तीत जास्त देशांमध्ये फिरता येते? याचे उत्तर आहे जपान. पासपोर्ट जपानचा असेल तर 193 देशांत व्हिसा-फ्री एन्ट्री मिळते. ‘हेनली पासपोर्ट इंडेक्स’नुसार ही क्रमवारी ठरवण्यात येते. या यादीत पाहिला क्रमांक मिळवण्याचे जपानचे हे सलग पाचवे वर्ष आहे. या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे जाणून घ्या.
या क्रमवारीमध्ये सिंगापूर आणि साऊथ कोरिया यांना दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. त्यानंतर जर्मनी, स्पेन, फिनलंड, इटली, लक्झेंबर्ग यांचे नाव आहे. तर या यादीत सर्वात शेवटी अफगाणिस्तानचे नाव आहे.
पासपोर्टधारक व्हिसाशिवाय प्रवेश करू शकणाऱ्या देशांच्या संख्येनुसार ही क्रमवारी ठरवली जाते. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) कडुन मिळालेल्या डेटावरून ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ही क्रमवारी ठरवतात. या १०९ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ८९ वा आहे.