जगातील पहिलाजगातील पहिला बोलका यंत्रमानव जपानने अखेर अंतराळात पाठवला आहे. त्याचे नाव ‘किरोबो’ असून जपानी अंतराळवीरांना अवकाशात एकटे वाटू नये यासाठी तो त्यांचा सहकारी बनून राहणार आहे. जपानच्या एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तानेगाशिमा या दूरस्थ बेटावरून ‘एच २ बी’ या अग्निबाणाच्या मदतीने किरोबो हा यंत्रमानव पाठवण्यात आला. तो यानाच्या मालवाहू भागात ठेवण्यात आला होता. त्याच्या समवेत अंतराळवीरांसाठी अन्न, पाणी व इतर वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. जपानचा कोइची वाकाटा हा अंतराळवीर याच वर्षी अवकाशात जाणार आहे, त्याला सोबत करण्याचे काम हा यंत्रमानव करणार आहे.
किरोबो यंत्रमानवाच्या शून्य गुरूत्वाला अनेक चाचण्या घेण्यात आल्या असून उड्डाणापूर्वीही वेगळ्या सुरक्षा चाचण्या घेण्यात आल्या.
किरोबो यंत्रमानवाचे नाव किबो व रोबोट या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून देण्यात आले आहे. किरोबोचा एक सहकार यंत्रमानव हा पृथ्वीवरून त्याच्या संपर्कात राहील, त्याचे नाव मिराटा असे आहे. मानव-यंत्रमानव यांच्यात अंतराळामध्ये होणाऱ्या संवादात्मक बाबींसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या किबो-रोबोट या प्रकल्पाचा तो भाग आहे.
किरोबो व मिराटा हे दोन यंत्रमानव टोकियो विद्यापीठाने तयार केले आहेत. त्यांना आवाज ओळखण्याची क्षमता आहे, त्याचबरोबर त्यात कॅमेरा, भावनांची ओळख पटवणारे सॉफ्टवेअर, नैसर्गिक भाषा संस्करण अशा सुविधा त्यात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा