जपानमधली करोना आणीबाणी संपली अशी घोषणा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केली आहे. करोनाच्या नव्या रुग्णांचं प्रमाण घटल्याने देशातील करोना आणीबाणी आता संपवण्यात आली आहे असं शिंजो आबे यांनी म्हटलं आहे. आम्ही ही आणीबाणी उठवण्यासाठी एक विशिष्ट धोरण आखलं होतं. आमच्या देशात आढळणाऱ्या नव्या करोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामुळे आता देशभरात आणीबाणीची गरज नाही म्हणून ही आणीबाणी आम्ही देशपातळीवर उठवत आहोत असंही आबे यांनी म्हटलं आहे.

आमचा देश करोनाविरोधातली लढाई अत्यंत योग्य पद्धतीने लढतो आहे. त्यामुळे आमच्या देशात असलेली करोना आणीबाणी आम्ही संपवतो आहोत असंही जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटलं आहे.

 

Story img Loader