Japan Earthquake & Tsunami Video: जपानमध्ये सोमवारी १ जानेवारीला ७.६ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. तत्पूर्वी ४.० तीव्रतेपेक्षा कमीत कमी २१ भूकंप झाले होते ज्यानंतर देशाने सुनामीचा इशारा जारी केला होता . मध्य जपान मधील भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता वाढत असताना लगेचच जपानच्या किनारपट्टीवर १.२ मीटर उंचीच्या लाटांनी धडक दिली होती. इशिकावा परिसरातील वाजिमा किनाऱ्यावर १.२ मीटर उंचीच्या लाटा उसळल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. .
जपानच्या हवामान संस्थेच्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ४:२१ वाजता इशिकावा प्रांतातील वाजिमा बंदरावर १.२ मीटर (चार फूट) उंच लाटा उसळल्या. तर संध्याकाळी ४ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास टोयामा प्रीफेक्चरमध्ये ८० सेंटीमीटरच्या लाटा पोहोचल्या. मिनिटाभरानंतर लगेचच ४० सेंटीमीटर च्या लाटा निगाता प्रीफेक्चर, काशीवाझाकी इथवर पोहोचल्या होत्या.
या भीषण स्थितीचा एका व्हिडिओ सध्या पाहायला मिळत आहे. यामध्ये नमूद केल्याप्रमाणे इशिकावा प्रीफेक्चरमधील सीवॉलवर लाटा आदळल्याने ही भिंत तुटल्याचे दिसतेय तर दुसर्या व्हिडिओमध्ये निगाता प्रीफेक्चरमध्ये कारला जोरदार लाट आदळल्याचे दिसले.
दरम्यान, शक्तिशाली भूकंपामुळे जपानमधील काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वृत्तानुसार, शेकडो रहिवासी विजेच्या शिवाय राहत आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, अधिकाऱ्यांनी लोकांना इशिकावा, निगाता, टोयामा आणि यामागाता प्रांतातील किनारी भागातून बाहेर काढण्यास आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. जपान भूकंपाच्या केंद्राजवळील प्रमुख महामार्ग वाहतूक अधिकाऱ्यांनी बंद केले आहेत.
हे ही वाचा<< Japan Earthquake : भूकंपामुळे हाहाकार, १२ जणांचा मृत्यू, त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर लाखो लोकांचं स्थलांतर
निगाता, टोयामा, यामागाता, फुकुई आणि ह्योगो प्रांतांसाठी, जपान समुद्राच्या किनार्यावर त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, रशियाने सखालिनच्या पश्चिम किनार्यावरील काही भागांसाठी त्सुनामीचा धोका घोषित केला आहे. जपानच्या भूकंपानंतर रहिवाशांना उंचीवरील ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.