एकीकडे नववर्षांची धामधुम जगभरात सुरू आहे. अशातच जपानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. जपानमध्ये सोमवारी ( १ जानेवारी ) ७.६ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेचा जोरदार भूकंपाचा धक्का बसला. यानंतर जपानच्या हवामान विभागानं त्सुनामीचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : भूकंप का होतात? भूकंपाच्या आधीच प्राणी व पक्षांना कशी लागते चाहूल?

पश्चिम जपानच्या इशिकावा आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यानंतर सागरी लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निगाटा, टोयामा, यामागाटा, फुकुई, ह्योगो किनारी परिसरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : भूकंप म्हणजे नेमके काय?

इशिकावा आणि परिसरात ७.६ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेचा भूकंपचा धक्का जाणवला, असं जपानच्या हवामान विभागानं सांगितलं. यामुळे समुद्रात ५ मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जनतेनं किनारी भाग सोडून इमारतीच्या वरच्या भागावर किंवा उंच ठिकाणी आश्रय घ्यावा, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

Story img Loader