हेरगिरीच्या संशयावरून जपानी नागरिकाला चीनने अटक केल्याच्या वृत्ताला जपानने दुजोरा दिला आहे.चीनच्या सुरक्षा यंत्रणांनी यापूर्वीच जपानच्या दोघा जणांना अटक केली आहे.
सुरू असलेले अटकसत्र व शोधमोहिमेमुळे आशिया खंडातील आर्थिक महासत्ता असलेल्या दोन देशांमधील संबध अधिकच तणावग्रस्त झाले आहेत. टोकियोतील सरकारच्या उच्चपदस्थ अधिकारी योशीहीदे सुगा यांनी शुक्रवारी याबाबतचा खुलासा करताना सांगितले की, जून महिन्यातच शांघायमधून ताब्यात घेण्यात आलेल्या एका जपानी महिलेला नोव्हेंबरमध्ये अधिकृतपणे अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर जूनमध्येच आणखी एका जपानी नागरिकालादेखील बीजिंगमधून फौजदारी स्थानबध्द केले होते, तर सप्टेंबर महिन्यात चीनकडून जपानच्या दोन नागरिकांना हेरगिरीच्या संशयावरून अटक केल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले होते. आत्तापर्यंत चार जपानी नागरिकांना हेरगिरीच्या संशयावरून चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. सुगा यांनी पत्रकारांशी बोलताना, जपानवरील हेरगिरीचे आरोप फेटाळून लावत जपानचा कोणताही नागरिक कुठल्याही देशात अशा प्रकारच्या कृत्यामध्ये सहभागी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Story img Loader