जयपूरमधील धुनू उपनगरात एका २० वर्षीय जपानी तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रात्री उशीराने घडलेल्या या घटनेबाबत पीडित तरुणीने धुनू पोलीस स्थानकात एफआयआर नोंदविला असल्याची माहिती जयपूर विभागाचे पोलीस महासंचालक डी. सी. जैन यांनी ‘पीटीआय’ला दीली. सदर प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, एक पर्यटक म्हणून गुलाबी शहरात आलेली ही तरुणी रविवारी जलमहालाला भेट देण्यासाठी गेली असता, तेथे पंचविशीतल्या एका तरुणाने पर्यटनस्थळे दाखविण्याचे आमिष दाखवून तिला आपल्या जाळ्यात ओढले. या तरुणाने सदर तरुणीला दिवसभरात दुचाकीवरून फिरवून काही पर्यटनस्थळांच्या ठिकाणी नेले आणि रात्री उशिराने धुनूमधील मोजामाबाद गावाजवळील वाळवंटात तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपीचा शोध सुरु असून, घटनेचा पूर्ण तपशील येणे अजून बाकी असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा