जपानच्या ज्या दोघांना इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) अतिरेक्यांनी ओलीस ठेवले होते, त्यातील एकाची हत्या करण्यात आली असून जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  
अॅबे यांनी सुरक्षा कंत्राटदार असलेल्या व इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी ठार मारलेल्या यारूना युकावा याच्या वडिलांशी संवाद साधला व दुसरा ओलीस असलेला मुक्त पत्रकार केन्जी गोटो याला सोडून देण्याची मागणी केली.  युकावा याच्या मृत्यूचा व्हिडीओ अतिरेक्यांनी शनिवारी  ऑनलाइन टाकला.
या दोन्ही जपानी ओलिसांच्या सुटकेसाठी २०० दशलक्ष डॉलर्सची खंडणी देण्याची आणि जॉर्डनमध्ये पकडलेली महिला अतिरेकी साजिदा अल रिशावी हिला सोडून द्यावे, अशी मागणी इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा