पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारल्यावर नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन बंडखोरी केली आहे.
लाल किल्ला- अंतर्गत संघर्षांचे आव्हान!
आज(सोमवार) जसवंत सिंग यांनी बारमेर या त्यांच्या पारंपारीक मतदार संघातून अपक्ष म्हणून नामनिर्देश अर्ज दाखल केला. गत निवडणुकीत दार्जिलिंगमधून विजयी झालेल्या जसवंत सिंह यांचा पत्ता कापून येथून एस. एस. अहलुवालिया यांना यापूर्वीच पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजस्थानच्या बाडमेरमधून उमेदवारी मिळावी यासाठी जसवंत सिंह प्रयत्न करीत होते. मात्र काँग्रेसमधून भाजपच्या गोटात दाखल झालेल्या कर्नल सोनाराम यांना उमेदवारी दिली. कर्नल सोनाराम राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे समर्थक मानले जातात.  मात्र, त्यामुळे  जसवंत सिंह यांनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची घोषणा करीत भाजपच्या संसदीय मंडळाला आव्हान दिले आहे.
खऱ्याखोटय़ाची पारख करा