केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मध्य प्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. फगन कुलस्ते लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या जागेवर जावडेकर यांची निवड झाली. याखेरीज बिहारमधून संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांची निवड झाली आहे. शरद यादव यांनी बिनविरोध विजय मिळवला असला तरी इतर दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये जनता दलाचे उमेदवार पवन वर्मा आणि गुलाम रसूल बलयावी यांच्यासह अनिल शर्मा आणि साबीर अली हे दोन अपक्ष रिंगणात आहेत.कर्नाटकमधून काँग्रेसचे बी.के. हरिप्रसाद आणि राजीव गौडा, तर भाजपचे प्रभाकर कोरे यांची बिनविरोध निवड झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javadekar sharad yadav elected unopposed to rajya sabha