भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे सदस्य प्रकाश जावडेकर यांची मंगळवारी पक्षाचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या संसदीय मंडळाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ही माहिती दिली.
भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी झाली. त्यावेळी अडवाणी यांनी जावडेकर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. भाजपच्या राज्यसभेतील मुख्य प्रतोद मायासिंग राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ग्वाल्हेर पूर्व मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या जागेवर जावडेकर यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2013 रोजी प्रकाशित
राज्यसभेत भाजपच्या मुख्य प्रतोदपदी प्रकाश जावडेकर यांची नियुक्ती
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे सदस्य प्रकाश जावडेकर यांची मंगळवारी पक्षाचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली.

First published on: 10-12-2013 at 02:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javadekar will be bjps chief whip in rajya sabha advani