आज दिवसभर बी टाऊनमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या ईडी चौकशीची जोरदार चर्चा सुरू होती. पनामा पेपर्स प्रकरणी ऐश्वर्या रायची तब्बल ५ तास ईडीनं चौकशी केली. मात्र, मुंबईकडे या प्रकरणामुळे वातावरण तापलं असताना राजधानी दिल्लीत राज्यसभेत ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सासू जया बच्चन यांच्यामुळे वातावरण तापलं. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की जया बच्चन यांनी थेट सरकारला शापच देऊन टाकला! ही परिस्थिती निवळण्यासाठी अखेर राज्यसभेच्या सभापतींना सभागृह काही काळ तहकूब करावं लागलं. जया बच्चन यांच्या या संतापाचं कारण थेट ऐश्वर्या राय बच्चनच्या चौकशीमध्ये असल्याची जोरदार चर्चा दिवसभर रंगली होती.

नेमकं झालं काय?

राज्यसभेमध्ये ड्रग्जविरोधी विधेयकासंदर्भात चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा पारा चांगलाच चढला. विधेयकाच्या चर्चेऐवजी जया बच्चन यांनी थेट १२ निलंबित खासदारांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करायला सुरुवात केली. “आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही सरकारकडून न्यायाची अपेक्षा करत नाही, पण तुमच्याकडून करू शकतो. तुम्ही या सभागृहाच्या किंवा बाहेर बसलेल्या १२ सदस्यांना कसं संरक्षण देत आहात?” असा सवाल त्यांनी सभापतींना केला.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

दरम्यान, विधेयकावर चर्चा करत नसल्याचं सभापतींनी सांगताच “ही माझी बोलण्याची वेळ आहे. आम्हाला तीन ते चार तास फक्त एक क्लेरिकल एररवर चर्चा करण्यासाठी दिले का?” असं त्या म्हणाल्या. तसेच, विरोधी बाकांवर बसलेल्या सदस्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, “मैं आप से पूछती हूँ, आप किस के सामने बिन बजा रहे हो?”

वैयक्तिक टीका आणि जया बच्चन यांचा पारा अनावर!

याचदरम्यान भाजपा खासदार जुगल लोखंडवाला यांनी जया बच्चन यांना उद्देशून काहीतरी टिप्पणी केली. यामुळे गोंधळ अजूनच वाढला आणि जया बच्चन यांचा पारा त्याहून जास्त वाढला. “ते माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी कशी करू शकतात? ही फार वाईट बाब आहे की तुमच्यामध्ये थोडाही सेन्स नाही आणि बाहेर बसलेल्या आपल्या सहकाऱ्यांबाबत थोडाही सन्मान नाही”, असं जया बच्चन म्हणाल्या.

यावेळी बोलताना जया बच्चन यांनी रागाच्या भरात “तुम्हा लोकांचे वाईट दिवस फार लवकर येणार आहेत, मी तुम्हाला शाप देते”, असं म्हटलं. यामुळे सभागृहातला गोंधळ अजूनच वाढला. त्यामुळे सभापतींनी लागलीच कामकाज काही काळासाठी तहकूब केलं.

“त्यांनी असं बोलायला नको होतं”

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर जया बच्चन यांनी प्रतिक्रिया देताना कुणावरही टीका करणं टाळलं. “मला कुणावरही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही. जे काही घडलं, ते फार दुर्दैवी होतं आणि त्यांनी अशा पद्धतीने बोलायला नको होतं”, असं त्या म्हणाल्या.

जया बच्चनशी दररोज खोटं बोलतो; अमिताभ यांनी केला खुलासा

यावर लोखंडवाला यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही ड्रामा करू नका असं जेव्हा मी म्हणालो, तेव्हा संपूर्ण विरोधी पक्षांना उद्देशून मी म्हणालो होतो. नंतर मला सांगण्यात आलं की जया बच्चन सभागृहात संतापल्या आहेत. मी कुणाविरोधातही वैयक्तिक टिप्पणी केलेली नाही. मी सर्व विरोधकांकडे बघून ते म्हणालो होतो”, असं जुगल लोखंडवाला म्हणाले.

दरम्यान, मुंबईत ऐश्वर्या राय बच्चनची चौकशी सुरू असताना राज्यसभेत जया बच्चन अनपेक्षितपणे इतक्या भडकल्यामुळे या दोन्ही घडामोडींचा एकमेकांशी संबंध लावला जात आहे.

Story img Loader