श्रीलंकेतील तामिळींच्या समर्थनार्थ अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पक्षांनी केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या नोव्हेंबर महिन्यात कोलंबो येथे होणाऱ्या ‘चोगम’वर (कॉमनवेल्थ हेडस् ऑफ गव्हर्नमेंट मीटिंग) भारताने बहिष्कार घालावा, अशी मागणी या दोन्ही पक्षांतर्फे करण्यात आली आहे.  श्रीलंकेने तेथील अल्पसंख्य तामिळींवर जो अनन्वित अत्याचार चालवला आहे तो थांबविण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकणे गरजेचे आहे आणि यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या कोलंबो ‘चोगम’ बैठकीत तरी भारताने सहभागी होऊ नये, असे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सुचविले आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ही विनंती केली आहे. तत्पूर्वी तामिळी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोलंबो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ नये अशी मागणी, द्रमुकप्रमुख एम. करुणानिधी यांनी केली.

Story img Loader