तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या क्षुल्लक कारणांवरून पत्रे लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रास देत असल्याचा आरोप भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. त्यांची ही पत्रे कचऱ्यात टाकण्याच्या लायकीची असतात. जयललिता यांनी पंतप्रधानांना आजपर्यंत अनेक हास्यास्पद पत्रे पाठविली आहेत. नुकतेच त्यांनी नीट परीक्षेसंदर्भातील लिहलेले पंतप्रधानांना लिहलेले पत्रही तशाचप्रकारचे असून तेदेखील कचऱ्यात जाईल, असे सांगत स्वामींनी जयललिता यांची खिल्ली उडविली.
स्वामी म्हणाले की, ‘पंतप्रधानांना पत्र लिहिण्यामध्ये त्यांनी जागतिक विक्रम केलेला आहे. माझ्या मते त्यातील बहुतेक पत्रे निरुपयोगी पत्रांच्या टोपलीत जातात. सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या खून प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा ठोठावली, तर तमिळनाडूतील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित गुन्हेगारीला अशा प्रकारच्या शिक्षेतून सूट मिळण्याबाबतचा ठराव तमिळनाडू विधानसभेत मंजूर केला आहे, अशी माहिती देणारे हास्यास्पद पत्र त्या लिहितात. मला वाटते त्यांनी ‘नीट’बाबत लिहिलेले पत्रही निरुपयोगी पत्रांच्या टोपलीत जाणार आहे.
तमिळनाडूमध्ये पूर्वीपासूनच वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेतून (नीट) राज्याला वगळण्यात यावे, याबाबत जयललिता यांनी मोदी यांना पत्र लिहिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा