तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी शुक्रवारी राधाकृष्णननगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या वेळी अभाअद्रमुकचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्षांनी २७ जून रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केल्याने जयललिता यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे केवळ औपचारिकता राहिली आहे.
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणातील आरोपी असलेल्या शशिकला याही जयललिता यांच्यासमवेत उमेदवारी अर्ज सादर करताना हजर होत्या. जयललिता आपल्या निवासस्थानापासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाल्या तेव्हा वाटेत अभाअद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पक्षाचे ध्वज फडकावून आणि पारंपरिक दाक्षिणात्य संगीत वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

Story img Loader