केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारला जयललिता पाठिंबा देतील, अशी शक्यता वर्तविणाऱया अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्याला खुद्द जयललिता यांनीच गुरुवारी पक्षातून निलंबित केले. के. मलयसामी यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय जयललिता यांनी घेतला. मलयसामी हे अण्णाद्रमुकचे माजी खासदार आहेत.
बुधवारी ते म्हणाले होते की राजकीयदृष्ट्या दोघांमध्ये मतभेद असले तरी मोदी हे जयललितांचे चांगले मित्र आहेत. जर मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाले तर जयललिता त्यांच्या पक्षाशी आघाडी करतील.
एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाला लोकसभा निवडणुकीत ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2014 रोजी प्रकाशित
अण्णाद्रमुकच्या नेत्याची जयललितांकडून हकालपट्टी; मोदींशी आघाडीचे वक्तव्य भोवले
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारला जयललिता पाठिंबा देतील, अशी शक्यता वर्तविणाऱया अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्याला खुद्द जयललिता यांनीच गुरुवारी पक्षातून निलंबित केले.

First published on: 15-05-2014 at 01:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayalalithaa expels party leader malaisamy who suggested aiadmk will ally with modi