बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष ठरविल्याने अभाअद्रमुकच्या नेत्या जयललिता यांचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. जयललिता यांनी २२ मे रोजी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली आहे.
सदर बैठकीत जयललिता यांची अभाअद्रमुक पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी सर्वानुमते निवड होणार असल्याचे पक्षाच्या एका उच्चपदस्थाने सांगितले. सर्व आमदारांनी बैठकीला हजर राहणे आवश्यक असल्याचा आदेश त्यापूर्वी जयललिता यांनी जारी केला.जयललिता या सरकार स्थापनेचा दावा करतील आणि २२ ते २४ मे या कालावधीत तामिळनाडूच्या पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे सूत्रांनी सांगितले. पक्षप्रमुखांकडून आदेश मिळताच योग्य वेळी विद्यमान मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देतील, असेही सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा