कोटय़ावधी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी करण्यात येणार होती. मात्र, ही सुनावणी आता ७ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर जयललिता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात धाव घेतली होती. न्यायालयात जयललिता यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर सोमवारी या अर्जावरची सुनावणी ६ ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचे जाहीर केले होते. मात्र जयललिता यांचे वकील राम जेठमलानी यांनी तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती. ”गुन्हेगारी दंडसंहिता कलम ३८९ अन्वये जर एखाद्या प्रकरणी अपील प्रलंबित असेल तर जामीन देता येतो. कलम ३८९ अन्वये दोषी व्यक्तीविरोधात अपील प्रलंबित असेल तर न्यायालय शिक्षेला स्थगिती देऊ शकते. जर एखादी व्यक्ती तुरुंगात असेल तर तिला व्यक्तिगत जातमुचलक्यावर सोडता येते,” असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला होता. मात्र, मुख्य न्यायाधीश डी. एच. वाघेला यांनी जयललिता यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी करण्याचे मान्य केले होते. परंतु, आता ही सुनावणी ७ तारखेलाच होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा