तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अभाअद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज सादर करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ११३.७३ कोटी रुपये संपत्तीअसल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षीपेक्षा ही मालमत्ता ३.४० कोटी रुपयांनी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थावर मालमत्ता ४१.६३ कोटी रुपये तर जंगम मालमत्ता ७२.०९ कोटी रुपये असल्याचे जयललिता यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे ४१ हजार रुपये रोकड आणि २.०४ कोटी रुपयांची देणी असल्याचे नमूद केले असून कृषी व्यवसाय असल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी जयललिता यांनी ११७.१३ कोटी रुपयांची (४५.०४ कोटी रुपये स्थावर आणि ७२.०९ कोटी रुपये जंगम) मालमत्ता असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

Story img Loader