कर्नाटकमधील भाजपचे बंडखोर नेते बी. एस . येडियुरप्पा स्वगृही परतण्याची औपचारिक प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आपल्या कर्नाटक जनता पक्षाचे (केजेपी) भाजपमध्ये विलीनीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कर्नाटक विधानसभा अध्यक्षांकडे शुक्रवारी दिला. त्यामुळे जद(एस)ला कर्नाटक विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष या दर्जावर पाणी सोडावे लागणार आहे. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी कर्नाटक जनता पक्षाचे आमदार यू. बी. बँकर, यू. बी. पाटील आणि जी. नागमरापल्ली यांच्यासमवेत विधानसभा अध्यक्ष के. थिमाप्पा यांची भेट घेतली आणि आपल्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याबाबतचे पत्र त्यांना दिले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 04-01-2014 at 12:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jds to lose main opposition status in karnataka