रालोआशी काडीमोड निश्चित
नरेंद्र मोदींच्या मुद्दय़ावरून भाजपप्रणीत रालोआची साथ सोडण्याच्या निर्णयावर संयुक्त जनता दल (जेडीयू) अद्याप ठामच असून आता केवळ त्याची औपचारिक घोषणा करणे बाकी आहे. शनिवारी रात्री जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव तातडीने पाटण्यात दाखल झाले. आज, शनिवारी जेडीयूच्या सर्व आमदार व खासदारांची पाटण्यात बैठक होणार असून त्यात रालोआशी काडीमोड घेण्याच्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
* भाजपचा इशारा
बिहारमधील जेडीयू-भाजप युतीचे सरकारही धोक्यात आले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी व भाजप आमदारांनी शनिवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आलेल्या बैठकीला पाठ दाखवली. जेडीयू रालोआतून बाहेर पडल्यास पाठिंबा काढून घेण्याचा इशाराही बिहार भाजपने दिला आहे.
* संघाची टीका
मोदींची निवड आणि जेडीयूचा आडमुठेपणा यावर प्रथमच भाष्य करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्रातून जेडीयूवर टीकेचे असूड ओढले. मोदींची नेमणूक म्हणजे ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असा अर्थ होत नाही असे स्पष्ट करत भाजपला कोंडीत पकडण्याचा जेडीयूने करत असलेला प्रयत्न देशाच्या पुढील वाटचालीसाठी योग्य नसल्याची टीकाही यात करण्यात आली आहे.
* काँग्रेसचे आमंत्रण
जेडीयूला आपल्या कळपात ओढण्याची तयारी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने चालवली आहे. काँग्रेसने जेडीयू हा आपला समविचारी पक्ष असून त्याचे संयुक्त पुरोगामी आघाडीत स्वागतच असेल असे संकेत शनिवारी दिले.
* मोदींच्या मंत्र्याला शिक्षा
नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील जलसंधानमंत्री बाबू बोखिरिया यांना बेकायदेशीर खाणकामप्रकरणी पोरबंदर येथील न्यायालयाने शनिवारी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
जेडीयूचा आज निर्णय ?
नरेंद्र मोदींच्या मुद्दय़ावरून भाजपप्रणीत रालोआची साथ सोडण्याच्या निर्णयावर संयुक्त जनता दल (जेडीयू) अद्याप ठामच असून आता केवळ त्याची औपचारिक घोषणा करणे बाकी आहे. शनिवारी रात्री जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव तातडीने पाटण्यात दाखल झाले.
First published on: 16-06-2013 at 04:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jdu decision today