नुकतेच लालूंच्या राष्ट्रीय जनता दलातील आमदारांच्या बंडखोरीने बिहारमधील राजकीय वातावरण धुसमुळत असताना आता ‘राजद’ कट्टर विरोधी नितीशकुमारांच्या जेडीयू पक्षातून खासदार शिवानंद तिवारी आणि इतर चार बंडखोर खासदारांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
लोकसभेतील चार आणि राज्यसभेतील एका खासदाराचे जेडीयूने निलंबन केले आहे. लोकसभेच्या जयनारायण निशाद, पुर्णमासी राम, सुशीलकुमार सिंह आणि मनगानीलाल मंदाल यांची तसेच, राज्यसभेतील शिवानंद तिवारी यांची जेडीयूने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Story img Loader