‘जेडीयू’चे आमदार शोएब इकबाल यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारला दिलेले समर्थन मागे घेण्याची धमकी दिली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास मोहरमबाबत विवादास्पद विधान करताना दिसत आहेत. याची गंभीर दखल घेत इकबाल यांनी कुमार विश्वास यांना माफी मागण्यास सांगितले आहे.
शोएब इकबाल यांचे म्हणणे आहे कि, त्यांनी केलेली विधानं योग्य नसून कुमार विश्वास यांनी याबाबत माफी मागायला हवी अन्यथा ते सरकारला दिलेले समर्थन मागे घेतील.
दरम्यान, त्यांनी इकबाल यांनी समर्थन मागे घेतल्यास ‘आप’ला विशेष फरक पडणार नाही, कारण ‘आम आदमी पक्ष’ कॉंग्रेसच्या समर्थनावर सत्तेत आला आहे.
कुमार विश्वास यांनी माफी न मागितल्यास समर्थन मागे घेईन – शोएब इकबाल
'जेडीयू'चे आमदार शोएब इकबाल यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारला दिलेले समर्थन मागे घेण्याची धमकी दिली आहे.
First published on: 06-01-2014 at 12:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jdu mla shoaib iqbal threatens to withdraw support