तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित कॅश फॉर क्वेरी प्रकरणावरील नीतिमत्ता समितीचा अहवाल शुक्रवारी (८ डिसेंबर) लोकसभेत मांडण्यात आला. या अहवालात मोईत्रा यांना बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली होती. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तसेच मोईत्रा यांनी संसदेकडून दिला जाणारा लॉग-इन आयडी आणि पासवर्डही हिरानंदानी यांना दिला होता. त्यावरून हिरानंदानी यांनी अदानी समूहासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. त्याबदल्यात मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे मोईत्रा यांची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे प्रकरण नितीमत्ता समितीकडे पाठवलं होतं.

दरम्यान, महुआ मोईत्रा यांच्या बचावासाठी वेगवेगळे पक्ष उभे राहिले आहेत. जनता दल युनायटेडचे खासदार गिरधारी यादव यांनीदेखील लोकसभेत यावर भाष्य केलं. बिहारच्या बांका मतदार संघाचे खासदार गिरधारी यादव लोकसभा अध्यक्षांसमोर म्हणाले, माझा पीए (स्वीय सहाय्यक) लोकसभेत प्रश्न विचारतो. माझा प्रश्न मी स्वतः लिहित नाही. हे सगळं काम माझा स्वीय सहाय्यक करतो. गिरधारी यादव यांच्या या वक्तव्यानंतर ओम बिर्ला संतापले आणि त्यांनी यादव यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला.

BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Extension of time to Ravindra Waikar to clarify his position on Amol Kirtikar petition print politics news
कीर्तिकरांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वायकर यांना मुदतवाढ
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
Joe Biden praise on kamala harris
कमला हॅरिस इतिहास घडवतील! बायडेन यांच्याकडून विश्वास व्यक्त; लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन

गिरधारी यादव म्हणाले, मला तर माझा पासवर्डसुद्धा आठवत नाही. ते सगळं काम माझ्या स्वीय सहाय्यकाकडे असतं. यावेळी मी भितीपोटी एकही प्रश्न विचारला नाही. कारण मला वाटत होतं की, काही विचारलं तर काय होईल काही सांगता येत नाही. माझा सहाय्यक माझे प्रश्न विचारतो. मी कधीच माझा प्रश्न बनवत नाही. माझ्याप्रमाणेच असे अनेक खासदार आहेत जे स्वतःचे प्रश्न स्वतः लिहित नाहीत.

हे ही वाचा >> खासदार महुआ मोईत्रा लोकसभेतून बडतर्फ; समितीचा अहवाल येताच काही तासांतच निर्णय

खासदार यादव म्हणाले, लोकशाहीत आम्हाला घाबरवलं जातंय. मला कॉम्यूटर वापरता येत नाही. मी तिसऱ्यांदा खासदार झालोय. त्याआधी चार वेळा आमदार होतो. म्हातारपणी मी हे सगळं शिकू शकतो का? या वयात हे सगळं शिकणं वगैरे मला शक्य नाही. त्यामुळे मी प्रश्नच विचारले नाहीत. आता आम्हाला हे सगळं नाही येत तर नाही येत. सर्वांसाठी वेगवेगळे कायदे कशासाठी? भाजपा मनुस्मृती लागू करण्याच्या प्रयत्नात आहे.