तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित कॅश फॉर क्वेरी प्रकरणावरील नीतिमत्ता समितीचा अहवाल शुक्रवारी (८ डिसेंबर) लोकसभेत मांडण्यात आला. या अहवालात मोईत्रा यांना बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली होती. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तसेच मोईत्रा यांनी संसदेकडून दिला जाणारा लॉग-इन आयडी आणि पासवर्डही हिरानंदानी यांना दिला होता. त्यावरून हिरानंदानी यांनी अदानी समूहासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. त्याबदल्यात मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे मोईत्रा यांची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे प्रकरण नितीमत्ता समितीकडे पाठवलं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा