अमेरिकेतील एका महिलाने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला उद्योजिका असणाऱ्या जेनिफर अर्करीने ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत आपले शरीरसंबंध होते असा गौप्यस्फोट एका मुलाखतीमध्ये केलाय. या प्रकरणासंदर्भात जॉन्सन यांच्याविरोधात चौकशीही सुरु झाली आहे. जेनिफरने दिलेल्या माहितीनुसार जॉन्सन आणि त्यांचं नात २०१२ ते २०१६ असं चार वर्ष होतं. याच कालावधीमध्ये जॉन्सन हे लंडनचे महापौर होते. त्यांनी आपली आधीची पत्नी मरीना व्हीलर यांच्याशी पुन्हा विवाह केला होता.

नक्की वाचा >> नवऱ्याने वर्षभरापासून सेक्स न केल्याने महिलेने दाखल केला FIR

‘द मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेनिफरने मी ज्या बोरिस जॉन्सन यांना ओळखते होते त्याचं अस्तित्वच आताच्या पंतप्रधानांमध्ये दिसून येत नाही, असं म्हटलं आहे. २०१९ मध्ये पहिल्यांदा या दोघांमधील नात्यासंदर्भात माहिती समोर आली तेव्हा बोरिस जॉन्सन यांनी मला मदत करण्यास नकार दिल्याचा दावाही जेनिफरने केलाय. २०११ साली एका कार्यक्रमामध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी महापौर पदाच्या पोटनिवडणुकींसाठीच्या प्रचारामध्ये मी बोरिस यांच्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं, असंही जेनिफरने सांगितलं आहे. लंडनमधील जेनिफर यांच्या घरीच पहिल्यांदा दोघांनी शरीरसंबंध ठेवले होते असा दावा जेनिफरने केलाय. आम्ही दोघेही एकमेकांकडे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आर्कर्षित झालो, असंही जेनिफरने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> संसद भवनात Sex आणि अश्लील चाळे… ऑस्ट्रेलियामध्ये राजकीय भूकंप

बोरिस यांनी लंडनमधील एका रेस्तराँमध्ये प्रपोज केल्याचंही जेनिफरने म्हटलं आहे. मला तुला डेट करायचं आहे असं बोरिस यांनी मला एका रेस्तराँध्ये सांगितलं. २०१२ च्या लंडन पॅराऑलम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या काही वेळ आधीच बोरिस यांच्यासोबत मी शोरेडिच फ्लॅटमध्ये पहिल्यांदा सेक्स केल्याचा दावा जेनिफरने केला आहे. आम्ही एकमेकांना सेक्शुअल फोटोही पाठवायचो असंही जेनिफरने म्हटलं आहे. अनेकदा तर बोरिसच्या कामाच्या वेळेतही मी त्याला फोटो पाठवायचे. आमचं अफेर सुरु असताना मी अनेकदा त्याला टॉपलेस फोटोही पाठवलेत, असंही जेनिफरने बोरिस यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांबद्दल बोलताना म्हटलं आहे. जेनिफर ही बोरिस यांच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान आहे. अनेकदा आम्ही एकाच खोलीत झोपायचो असंही जेनिफरने सांगितलं आहे.

Story img Loader