मुंबईहून दुबईला जाणाऱया ‘जेट एअरवेज’च्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यामुळे ते मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने उतरविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘टाईम्स ऑफ ओमन’ वृत्तपत्राच्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेट एअरवेज’च्या ‘९डब्ल्यू-५३६’ या विमानात बॉम्ब असल्याचा संदेश वैमानिकाला मिळाल्यामुळे त्याने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने उतरविले. त्यानंतर विमान निर्जनस्थळी नेऊन त्याची तपासणी केली असता ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले. हे विमान दुपारी एकच्या सुमारात मस्कतच्या विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अफवा असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे संबंधित अधिकाऱयांकडून विमानाच्या पुन्हा उड्डाणाचे निर्देश मिळण्याची वाट पाहत असल्याचे जेट एअरवेजचे कार्यकारी अधिकारी रियाज यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी बँकॉकहून इस्तंबूलला जाणाऱ्या टर्की एअरलाइन्सचे विमान देखील बॉम्बच्या अफवेमुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा