झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात समन्स बजावला आहे. मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी गुरुवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. “मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्याविरोधातील तपासादरम्यान काही तथ्ये समोर आली असून, त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे”, असे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

टीएमसी आमदाराच्या पत्नीला १ कोटींची लॉटरी; भाजपाकडून आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप, पश्चिम बंगालमध्ये नवा राजकीय वाद

पंकज मिश्रा बरहैट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अवैध खाणकाम प्रकरणात तपास यंत्रणेनं देशभरात शोधमोहीम हाती घेतली आहे. मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या साहिबगंज आणि आसपासच्या परिसरात तब्बल १ हजार कोटींचे अवैध उत्खनन झाल्याची माहिती ईडीने विशेष न्यायालयात दिली आहे.

धावपट्टीवरून ‘देवा’ची मिरवणूक काढण्यासाठी केरळातील विमानतळावर पाच तास उड्डाणे स्थगित

“मुख्यमंत्र्यांनी मिश्रा यांना संथल परगनामधील दगड आणि वाळू उत्खननातून येणारा निधी प्रेम प्रकाश यांना द्यायला सांगितला होता. या बदल्यात प्रकाश व्यापाऱ्यांकडे पैसे सुपुर्द करायचे”, असे ईडी चौकशीत झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी खजीनदार रवी केजरीवाल यांनी सांगितले आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अवैध उत्खननातून त्यांनी मोठी संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Story img Loader