2024 Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी तर उर्वरित ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ‘इंडिया’ आणि रालोआ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) अशा दोन्ही आघाड्यांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे. भाजपाने केलेल्या जोरदार टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर, आरोपांच्या फैरी आदींनी निवडणूक प्रचाराचा पहिला टप्पा गाजला. पहिल्या टप्प्यातील सकाळच्या सत्रात आतापर्यंत १३. ४ टक्के मतदान झालं. तर, दुपारी एक वाजेपर्यंत ४६. २५ टक्के मतदान झालं. दुपारी तीन वाजेपर्यंत ५९.२८ टक्के मतदान झालं आहे.
दरम्यान, ‘झारखंडमध्ये आदिवासींची लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. येथे भाजपाचे सरकार आल्यास घुसखोरांची ओळख पटवून त्यांना हुसकावून लावण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल तसेच त्यांनी बळकावलेल्या जमिनीवर पुन्हा दावा केला जाईल, आदिवासी महिलांशी विवाह करणाऱ्या घुसखोरांना जमिनीचे हस्तांतरण रोखण्यासाठी कायदा आणला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केली.
#JharkhandAssemblyElection2024 | Jharkhand (Phase-1)recorded 13.04% voter turnout till 9 am, as per the Election Commission of India.#WayanadByElection2024 | Wayanad recorded 13.04% voter turnout till 9 am, as per the Election Commission of India. pic.twitter.com/5OI9p3Adtk
— ANI (@ANI) November 13, 2024
Voting begins for the first phase of Jharkhand assembly elections; In this phase, voting is taking place on 43 out of 81 seats.
— ANI (@ANI) November 13, 2024
Voting has also begun in the by-elections for 31 assembly seats spread across 10 states, as well as for the Wayanad Lok Sabha constituency in Kerala. pic.twitter.com/muTcQsr2nx
पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
पहिल्या टप्प्यात बुधवारी होणाऱ्या मतदानाबाबतही नियमावली ठरवण्यात आली आहे. रांची विधानसभा मतदारसंघाचे रिटर्निंग अधिकारी उत्कर्ष कुमार यांनी सांगितलं की, सकाळी साडेपाच वाजला मॉक पोल सुरू झाला. तर सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, शौचालय आणि वेब कास्टिंगची सुविधा दिली गेली आहे. याशिवाय सुरक्षेसाठी सीएपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
Voting begins for the first phase of Jharkhand assembly elections; In this phase, voting is taking place on 43 out of 81 seats.
— ANI (@ANI) November 13, 2024
Voting has also begun in the by-elections for 31 assembly seats spread across 10 states, as well as for the Wayanad Lok Sabha constituency in Kerala. pic.twitter.com/muTcQsr2nx
गेल्या विधानसभेत काय होती परिस्थिती?
गेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने ३० जागा जिंकल्या होत्या. भाजपाला २५ आणि काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील जागांसाठी ७३ महिलांसह एकूण ६८३ उमेदवार रिंगणात आहेत. ४३ मतदारसंघांपैकी १७ सर्वसाधारण जागांसाठी २० अनुसूचित जमातीसाठी आणि सहा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.
झारखंडमध्ये भाजपाचा प्रचार केवळ सांप्रदायिक ध्रुवीकरणावर केंद्रित आहे. १० वर्षांच्या सत्तेनंतरही भाजपा केवळ धार्मिक ध्रुवीकरणावर मते मागत असल्याचा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. येत्या १३ आणि २० नोव्हेंबर रोजी झारखंडमधील जनता सातत्य, जातीय सलोखा आणि आत्मसन्मानासाठी निर्णायकपणे मतदान करतील, असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केला. झारखंडमधील ‘इंडिया’ आघाडीचा प्रचार गेल्या पाच वर्षांतील सरकारच्या कामगिरीवर आहे, आम्ही सर्वसमावेशक आणि समृद्ध झारखंडसाठी आमची दृष्टी आदींवर लक्ष केंद्रित करत आहोत’, असेही रमेश म्हणाले.
Ranchi: Santosh Kumar Gangwar, Governor of Jharkhand shows his inked finger after casting his vote for #JharkhandAssemblyElections2024 pic.twitter.com/KWMhL3GBvM
— ANI (@ANI) November 13, 2024
वायनाडमध्ये आज पोटनिवडणूक
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ४३ जागांव्यतिरिक्त देशातील दहा राज्यांतील ३२ जागांवर पोटनिवडणुकीचंही मतदान आज होत आहे. ३२ जागांपैकी एक लोकसभा आणि ३१ विधानसभेच्या जागा आहेत. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी ही मतदान प्रक्रिया असून येथून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभेच्या जागा आहेत.