Jharkhand ex CM Champai Soren joining BJP?: झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावर्षाच्या सुरुवातीला झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या नंतर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी चंपई सोरेन यांच्याकडे सोपविण्यात आली होती. हेमंत सोरेन हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ३ जुलै रोजी चंपई सोरेन यांचा राजीनामा घेण्यात आला होता. मात्र आपल्या मनाविरुद्ध राजीनामा घेतल्यामुळे चंपई सोरेन गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच ते आता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.

झारखंडमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कदाचित दिवाळीनंतर महाराष्ट्रासह झारखंडमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बाहेर न पडलेले चंपई सोरेन आज माध्यमांसमोर आले आणि त्यांनी भाजपात प्रवेश करण्याबाबत भाष्य केले.

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका

हे वाचा >> “वरिष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रिपदावरून हटवल्याने…”, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हेमंत सोरेन, JMM-काँग्रेसवर हल्लाबोल

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “मी नाराज असल्याची अफवा कशी पसरली, याची मलाच कल्पना नाही. माध्यमे कोणत्या बातम्या चालवत आहेत, याबाबत मला निश्चित कल्पना नाही. मी जिथे होतो, तिथेच आहे.” यावेळी पत्रकारांनी तुम्ही दिल्लीला कधी निघणार आहात? असाही प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, “आता तरी मी घरी चाललोय, पुढचे काही सांगू शकत नाही.”

हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर चंपई सोरेन यांनी २ फेब्रुवारी ते ३ जुलै पर्यंत झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. २८ जून रोजी झारखंड उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर चंपई सोरेन यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. ४ जुलै रोजी हेमंत सरेन यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात चंपई सोरेन यांचाही समावेश करण्यात आला. त्यांना उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण खात्याबरोबरच जलसंपदा विभागाचाही अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला.

चंपई सोरेन यांची चूक काय? भाजपाचा आरोप

निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविले गेल्यामुळे भाजपाने झारखंड मुक्ती मोर्चावर आरोपांची राळ उठवली आहे. चंपई सोरेन यांची चूक काय होती? असा सवाल भाजपाचे खासदार दीपक प्रकाश यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचा >> झारखंड सरकार धोक्यात? सत्ताधारी JMM-काँग्रेस आमदारांना तेलंगणात हालवण्याच्या हालचालींना वेग, भाजपा उद्या…

एएनआयशी बोलताना ते म्हणाले, “चंपई सोरेन हे मोठे नेते आहेत. त्यांच्या कामामुळे राज्यातील ३.५ कोटी जनता आनंदी होती. पण त्यांना तडकाफडकी मुख्यमंत्रीपदावरून हटवणे दुर्दैवी होते. हा राज्यासाठी मोठा धक्का होता. त्यांची नेमकी चूक काय होती?” दरम्यान आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंडचे भाजपा प्रभारी हिंमता बिस्व सरमा यांनी मात्र चंपई सोरेन यांच्या भाजपा प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली.