ईडीने अटक केल्याने हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त जागेवर झारखंड मुक्ती मोर्चाचे चंपई सोरेन यांची निवड करण्यात आली असून त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता, सोमवारी विधानसभेत त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे ४० आमदारांना तेलंगणाची राजधानी हैदराबादजवळील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

कथित भ्रष्टाचार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासादरम्यान हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रातील भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी कमकुवत करण्यासाठी जाणूनबुजून झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला लक्ष्य केले आहे, असा आरोप हेमंत सोरेन यांनी केला. झारखंड विधानसभेत ८१ जागा आहेत आणि त्यामुळे बहुमताचा आकडा ४१ आहे.

Kalpana Soren electoral campaign
Kalpana Soren: झारखंड विधानसभा निवडणुकीत कल्पना सोरेन यांची हवा; महिलांसाठीच्या योजना गेमचेंजर ठरणार?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
shiv sena shinde group claim 73 thousand duplicate voters in navi mumbai
गावाकडच्या दुबार मतदारांमुळे नवी मुंबईत खळबळ
Sri Lanka polls Ruling NPP secures two thirds majority
श्रीलंकेच्या संसदेत एनपीपीला बहुमत ; २२५ पैकी १५९ जागांवर विजय
rohit pawar statement on bjp and modi,amit shah and yogi
महाराष्ट्र संतांची भूमी येथे “बटेंगे तो कटेंगे”ला थारा नाही…प्रफुल्ल पटेलांच्या गृहनगरातून रोहित पवारांनी…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही

हेही वाचा >> झारखंड राज्यनिर्मिती चळवळीतील कार्यकर्ता ते मुख्यमंत्री; कोण आहेत चंपई सोरेन?

बहुमत चाचणी पार पडेपर्यंत आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवले जाणार आहे, असं झारखंड काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. “मुख्यमंत्र्यांनी पायउतार होणे आणि पक्षाच्या सहकाऱ्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा देणे अकल्पनीय आणि अभूतपूर्व आहे. संपूर्ण आघाडीने हेमंत सोरेन यांच्या उत्तराधिकाऱ्याची एकमताने निवड केली आणि पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचा औपचारिकपणे राज्यपालांकडे प्रस्ताव दिला. त्याबद्दल आम्ही राज्यपालांचे आभारी आहोत. काल शपथविधी सोहळा होऊ दिला”, असं गुलाम अहमद मीर म्हणाले.

“झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला ५ फेब्रुवारीला विधानसभेत बहुमत चाचणीसाठी आमंत्रित केले जाईल. तोपर्यंत आमचे सर्व आमदार सुरक्षि ठिकाणी राहतील”, असे काँग्रेसच्या नेत्याने भारत जोडो न्याय यात्रेत म्हटलं. “भाजपाने झारखंड सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, परंतु इंडिया आघाडी त्यांच्या षड्यंत्राविरुद्ध उभा राहिला आहे”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

हेही वाचा >> विश्लेषण : बहुमत म्हणजे काय? ते कसं, कोणाला आणि कधी सिद्ध करावं लागतं?; महाराष्ट्रातील बहुमताचे निकष काय?

बहुमताची आकडेवारी कशी आहे?

सप्टेंबर २०२२ मध्ये, हेमंत सोरेन यांनी ४८ जणांच्या मतांनी बहुमत चाचणी पार पाडली होती. त्यानंतरही हे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते, असा आरोप सोरेन यांनी केला. झारखंड विधानसभेत ८० जागा आहेत आणि बहुमताचा आकडा ४१ आहे. त्यानुसार, JMM-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल (RJD) युतीकडे ४६ जागा आहेत. JMM २८, काँग्रेस १६, RJD १, आणि CPI(ML) लिबरेशन १ अशा जागा आहेत.

विरोधी पक्षांकडे किती संख्याबळ?

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA), ज्यामध्ये भाजप, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (AJSU) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) यांचा समावेश आहे. यांचे मिळून २९ आमदार आहेत. दरम्यान, चंपाई सोरेन यांचे सरकार फ्लोअर टेस्टद्वारे प्रवासासाठी तयार असल्याचे दिसते.