रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बीपी यांच्या संयुक्त उपक्रमातून व्यावसायिक स्तरावर इलेक्ट्रिक वेहिकल्ससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यासाठी ब्लूस्मार्टसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. ब्लूस्मार्ट हे भारतातील पहिले आणि सर्वात मोठे ऑल-इलेक्ट्रिक, राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म आहे. या अंतर्गत जिओ-बीपी देशभरातील प्रवासी इलेक्ट्रिक वाहने आणि ताफ्यांसाठी ही स्थानके उभारणार आहे. ब्लूस्मार्ट, त्याच्या सर्व-इलेक्ट्रिक फ्लीटद्वारे, दिल्ली एनसीआरमध्ये विश्वसनीय, झिरो सर्ज आणि झिरो टेलपाईप उत्सर्जन राइड-हेलिंग सेवा प्रदान करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा ताफा चालवणाऱ्या ब्लूस्मार्टचे लक्ष्य भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये आपले नेटवर्क वाढवण्याचे आहे.

जिओ-बीपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश सी मेहता म्हणाले, “युकेकडे सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग नेटवर्क आहे. बीपी पल्सच्या सहाय्याने यूकेकडून तंत्रज्ञानं शिकून जर्मनीमधून त्यांच्या अरल ब्रँडद्वारे, आमच्या ग्राहकांसाठी नवीनतम ईव्ही तंत्रज्ञान आणण्याचा आमचा मानस आहे.” ते पुढे म्हणाले, “आरआयएलच्या नवीन उर्जा दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, त्याची प्रगत टीम भारतीयांना प्रवास करण्यासाठी स्वच्छ आणि स्मार्ट मार्ग तयार करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. ते म्हणाले, “ब्लूस्मार्टसोबत आमची भागीदारी नवीन युगातील कमी कार्बन उत्सर्जन, स्वच्छ आणि अधिक परवडणारे पर्याय देण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”

भागीदारीद्वारे, दोन्ही कंपन्या ब्लूस्मार्ट कार्यरत असलेल्या शहरांमध्ये योग्य ठिकाणी ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचे नियोजन, विकास आणि ऑपरेशनमध्ये सहकार्य करतील. दिल्लीमध्ये पहिल्या टप्प्यातील रोलआउटसह, हे ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या प्रत्येक स्टेशनवर किमान ३० वाहने बसविण्यास सक्षम असतील.

“ब्लुस्मार्ट मोठ्या ईव्ही चार्जिंग सुपरहब्स चालवते जे वाढत्या ईव्ही फ्लीटला शक्ती देते. ईव्ही सुपरहब्स हे ईव्ही चार्जिंगचे भविष्य आहे कारण ते ग्राहकांना आणि राईड-हेलिंग फ्लीट्सला मुंबलक चार्जिंग देते, येत्या काळात आम्ही सोबत मिळून जगातील काही सर्वात मोठे ईव्ही सुपरहब तयार करू,” असे ब्लूमस्मार्टचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल जग्गी म्हणाले.