JioPhone 2 खरेदी करण्याची ग्राहकांकडे आज आणखी एक संधी आहे. आज (गुरूवारी) दुपारी 12 वाजेपासून jio.com वर या फोनसाठी फ्लॅशसेल सुरू होत आहे. JioPhone 2 चा हा पाचवा सेल आहे. पेटीएमद्वारे हा फोन खरेदी केल्यास 200 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. तसंच कॅश ऑन डिलीव्हरीचा पर्याय (COD) देखील ग्राहकांसमोर आहे. हा फ्लॅशसेल असल्यामुळे मर्यादीत फोनचीच विक्री होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्याला फोनसाठी प्राधान्य दिलं जाईल. फ्लॅशसेलमध्ये खरेदी केल्यानंतर 5 ते 7 दिवसांमध्ये हा फोन ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Qwerty कीपॅड, यू ट्यूब, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ अॅप, हॉरिझेंटल डिस्प्ले ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे असून 2 हजार 999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे. फोनमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. या 4जी फोनमध्ये 2000 एमएएच बॅटरी असून त्यामुळे 14 तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत. जिओ फोन मान्सून हंगामा ऑफरअंतर्गत जिओ युजर्स अवघ्या 501 रुपयांमध्ये त्यांचा जुना फोन बदलू शकणार आहे.

कशी करावी नोंदणी –
उद्या दुपारी 12 वाजेपासून Jio.com आणि माय जिओ अॅपवर सेलला सुरूवात होईल. फोन खरेदी करण्यासाठी संकेतस्थळावर गेल्यानंतर Get Now पर्यायावर क्लिक करावं आणि फोनसाठी नोंदणी करावी. त्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक, पत्ता आदी माहिती द्यावी लागेल. फोन खरेदी कऱण्यासाठी कॅश ऑन डिलीव्हरीचा पर्याय मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला नेट बॅंकिंग अथवा डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करावं लागेल. फोनची डिलीव्हरी केव्हापासून सुरू होणार याबाबत जिओकडून माहिती देण्यात आलेली नाही.