आतापर्यंत झालेल्या दोन सेलमध्ये ज्या ग्राहकांना Jio Phone 2 खरेदी कता आला नाही अशा ग्राहकांसाठी आज पुन्हा एकदा संधी आहे. Jio Phone 2 चा तिसरा सेल आज आयोजीत करण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजेपासून फ्लॅशसेल सुरू होत असून ग्राहकांना हा फोन http://www.jio.com या वेबसाईटवर आणि myjio app वरुन खरेदी करता येईल. हा फ्लॅशसेल असल्यामुळे मर्यादीत फोनचीच विक्री होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्याला फोनसाठी प्राधान्य दिलं जाईल. फ्लॅशसेलमध्ये खरेदी केल्यानंतर 5 ते 7 दिवसांमध्ये हा फोन ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ग्राहकांना हवं असेल तर ते अधिकृत रिटेलरकडूनही फोन खरेदी करु शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Qwerty कीपॅड, यू ट्यूब, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ अॅप, हॉरिझेंटल डिस्प्ले ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे असून 2 हजार 999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे. फोनमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. या 4जी फोनमध्ये 2000 एमएएच बॅटरी असून त्यामुळे 14 तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत. जिओ फोन मान्सून हंगामा ऑफरअंतर्गत जिओ युजर्स अवघ्या 501 रुपयांमध्ये त्यांचा जुना फोन बदलू शकणार आहे.

कसा खरेदी करायचा-
– सर्वप्रथम जिओच्या संकेतस्थळावर असलेल्या लाल रंगाच्या Flash Sale बटनावर टॅप करा

– त्यानंतर Buy Now वर क्लिक करा

– आता तुम्हाला ज्या परिसरात या फोनची डिलीव्हरी हवी असेल त्या ठिकाणाचा पिनकोड विचारला जाईल. जर संबंधित ठिकाणी फोनची डिलिव्हरी होत असेल तर तुमची ऑर्डर कार्टमध्ये अॅडमध्ये केली जाईल आणि तुमच्यासमोर नवं पेज सुरू होईल.

– या पेजवर तुम्हाला तुमची खासगी माहिती म्हणजेच तुमचं नाव, ईमेल आयडी आणि फोन नंबर विचारला जाईल.

– त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी फोनची डिलीव्हरी हवी असेल तेथील संपूर्ण पत्ता टाकावा लागेल.

– आता तुम्हाला पेमेंट करावं लागेल. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग आणि जिओ मनीसारखे पर्याय मिळतील. तुम्हाला हवा तो पर्याय निवडून तुम्ही पेमेंट करु शकतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio phone 2 third flash sell starts
Show comments