आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचे बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी सोमवारी जोरदार खंडन केले. हे २०० टक्के असत्य आहे, असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारला विशेष दर्जा दिल्यास आपण मोदींचे समर्थक होऊ, असे वक्तव्य मांझी यांनी केल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे.भाजप हा जातीयवादी पक्ष असल्याचे आपण सातत्याने म्हटले आहे. आपण धर्मनिरपेक्ष पक्षात राहूनच राजकारण केले आहे, त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा आपण कसा विचार करणार, असा सवाल मांझी यांनी केला.या वृत्ताचे खंडन करतानाच मांझी यांनी, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनाच जद(यू) मध्ये येण्याचे निमंत्रण दिले. विधानसभेत आमच्याकडे बहुमत आहे, तुम्हीच जद(यू) मध्ये का येत नाही, असेही मांझी म्हणाले.

Story img Loader