जनता दल (संयुक्त) चे नेते आणि माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी स्पर्धा करण्याच्या प्रयत्नात बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी हे ‘घोषणामंत्री’ झाले आहेत, अशी टीका भाजपने केली आहे.
अडीचशे दिवसांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात मांझी यांनी एक हजारांहून अधिक घोषणा केल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना फक्त २०० दिवस शिल्लक आहेत. सध्या ते दररोज डझनभराहून अधिक घोषणा करत आहेत, असे भाजपचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी म्हणाले.

Story img Loader