मणिपूरचा व्हिडीओ १९ जुलैला व्हायरल झाला. त्यानंतर यावरुन होणारी टीका थांबताना दिसत नाही. दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. त्यानंतर प्रतिक्रियाही येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आणि हिटलरचं उदाहरण देत जोरदार टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट?

हे प्रातिनधीक चित्र आहे १९४१ साली हिटलरने जर्मनीत पेरलेल्या ज्यू-द्वेषाचं…! अगदी मिसरूड फुटलेली जर्मन मुलेही ज्यू नागरिकांवर तुटून पडत…! हिटलर त्याला जर्मन राष्ट्रवाद म्हणत जर्मन लोकांना बहकावत राहिला… आणि त्यानं जर्मनीला अखेर विनाशाप्रत नेलं ! याच विचारसरणीचं प्रतिबिंब आज आम्ही देशात होत असलेल्या मुस्लीम आणि ख्रिश्चनद्वेषात पाहतोय. इतिहासातील गाडलेली मढी उकरून ज्यांचा धर्म आणि पोट अबाधित राहातं, त्यांना वेळीच रोखून देश एकसंध, एकजिनसी आणि एकात्म ठेवणं हा खरा राष्ट्रवाद !

हे पण वाचा- मणिपूर घटनेचे पडसाद सुरूच… ‘आझाद हिंद’चा रास्तारोको!

छत्रपती शिवरायांचं उदाहरण देतही टीका

स्त्री ही अनादी काळापासून एक भोगवस्तू ! मध्ययुगीन कालखंड तर स्त्रियांसाठी तमोयुग ! युद्धात जडजवाहिरे , संपत्ती जशी लुटली जाई तशीच स्त्री लुटली जाई. जगाच्या पाठीवर आजही तिची अब्रू लुटली जाते . महायुद्धकाळात जर्मनांनी फ्रान्स , रशिया आणि पादाक्रांत केलेल्या भागात सुटल्या तर रशियाने जर्मनीचा पाडाव झाल्यावर जर्मन स्त्रियांची अब्रू लुटली. रोम- ग्रीकांनी तेच केलं . चंगेजखानने तेच केलं आणि आखातातल्या सुलतान – सम्राटांनी तेच केलं.जापान्यांनी चिनींचे तेच हाल केले. पश्चिम पाकिस्तानने बांग्लादेशींवर असेच अत्याचार केले. पण शिवरायांनी युद्धात स्त्रियांना अभय दिलं . त्यांच्या अब्रूंचे रक्षण केले. तिला बाटवणारांचे हात कलम केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण केले ! रांज्याच्या पाटलाने एका स्त्रीच्या अब्रूवर हात घातला तेव्हा १६ व्या वर्षाच्या शिवरायांनी पाटलाचे हात – पाय कलम करून त्याचा चौरंग केला होता.

हे पण वाचा- “कोण कुणाला मूर्ख…”, मणिपूरमध्ये महिलांच्या नग्न धिंड प्रकरणावर जावेद अख्तर यांचा संताप

मोहिमेवर जाताना कुणी स्त्रीवर अत्याचार केला तर त्याचे मस्तक मारले जाईल असा सज्जड इशारा महाराज देत असत. दक्षिण दिग्विजयावेळी बेलवडीची गढी ताब्यात घेताना मल्लाम्मा देसाईशी अभद्र वागणाऱ्यांचे हात कलम केले आणि गढी परत दिली . तिच्या मुलांना मांडीवर घेऊन प्याल्याने दूध पाजतानाचे महाराजांचे भित्तीचित्र आजही त्या गढीत दिसते. महाराजांनी अफझलखानाच्या वधानंतर युद्धात शरण आलेल्या स्त्रियांचा साडी-चोळीने सन्मान करून त्यांची पाठवणी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad made two tweets on manipur viral video and criticized pm narendra modi scj