राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचं कौतुक केलं. तामिळनाडूच्या राज्यपालांनी विधानसभा अधिवेशनात कॅबिनेटने लिहून दिलेल्या भाषणातून थोर नेते रामास्वामी पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळला. यावेळी एम के स्टॅलिन यांनी त्वरित मुद्दा उपस्थित करत राज्यपालांचा निषेध केला. या प्रकारानंतर राज्यपाल अधिवेशन सोडून निघून गेले.

या सर्व प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाड म्हणाले, “काल तामिळनाडूच्या विधानसभेत राज्यपालांनी कॅबिनेटने लिहून दिलेल्या भाषणामधून काही गोष्टी गाळल्या. तामिळनाडूत ज्यांना देवासमान मानलं जातं. ज्यांना तेथील समाजसुधारणेचं सूत्रधार मानलं जातं, अशा पेरियार रामास्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचं राज्यपालांनी मुद्दामहून टाळलं. यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जागच्या जागी राज्यपालांचा निषेध केला. याचा राग आल्याने राज्यपाल विधानसभेच्या अधिवेशनाचं मैदान सोडून निघून गेले. पण मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यपालांना थांबवण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही, याचा मला अभिमान आहे,” असं विधान आव्हाड यांनी केलं.

Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?

हेही वाचा- “मला कामकाजाबद्दल सांगू नका, माझ्या कोर्टात कसं काम करायचं, हे मी ठरवेन”, सरन्यायाधीशांनी वरिष्ठ वकिलाला सुनावलं

आव्हाड पुढे म्हणाले, “महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, ही भारताची परंपरा आहे, या परंपरेला एम के स्टॅलिन जागले. तामिळनाडूत पेरियार रामास्वामी यांना देवासमान मानलं जातं. त्या पेरियार रामास्वामींचा अपमान झालाय… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालाय. कॅबिनेटने लिहून दिलेल्या भाषणाचा निर्णय राज्यपालांनी स्वत: व्यासपीठावर गेल्यानंतर फिरवला. त्यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन ताठ मानेनं उभे राहिले आणि राज्यपालांचा निषेध केला. यानंतर राज्यपाल अधिवेशनातून निघून जात होते. पण स्टॅलिन यांनी राज्यपालांना अडवण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही, त्यामुळे स्टॅलिन यांना माझा सलाम…,” अशा शब्दांत आव्हाडांनी एक स्टॅलिन यांचं कौतुक केलं.

Story img Loader