पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़. कालपासून या घटनेवरून राजकीय वादंग सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर टीका सुरू केली आहे. यातच राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
मोदींच्या सुरक्षेत त्रुटी: पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; सांगितलं पंजाबमध्ये नक्की काय घडलं
जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केलाय. राजीव गांधी यांच्यावर राजघाट येथे झाडाच्या मागे लपून हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या पी.एस.ओच्या कानाला लागून गेली होती. त्यानंतही तरीही राजीव गांधी यांनी हसतमुखाने सांगितले होते की ते ठीक आहेत.
दरम्यान, कालचा दौरा रद्द करावा लागल्यानंतर पंतप्रधान मोदींसह भाजपाकडून पंजाबमधील काँग्रेस सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. मी बठिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकतो, त्यासाठी तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, असंही मोदींनी विमानतळावरील कर्मचाऱ्याला म्हटलं होतं. त्यानंतर पंतप्रधान मोदीचा ताफा अडवल्यावरून भाजपाकडून चांगलंच राजकारण करण्यात येतंय. यावरूनच जितेंद्र आव्हाडांनी मोदींवर निशाणा साधलाय.
“ … असं होतं तर मग ते तिथे गेलेच कशाला होते?” ; राकेश टिकैत यांचा मोदींवर निशाणा!