DG of Aeronautical Development Body: स्वदेशी बनवाटीची हलक्या वजनाच्या लढाऊ विमान (तेजस) निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या भारत सरकारच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या महासंचालक पदी जितेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लढाऊ विमान विभागाच्या कार्यक्रम संचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच सोपविण्यात आला आहे. लढाऊ विमानांची निर्मिती करण्यामध्ये जाधव यांनी आजवर महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. स्वदेशी बनावटीचे हलक्या तेजस एमके – १ या विमानाच्या उत्पादनात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली असून या प्रकल्पाचे संचाकल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. शास्त्रज्ञ असलेल्या जाधव यांच्याकडे आता भारत सरकारने आणखी महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

वाचा >> ‘तेजस’ लढाऊ विमानांवरील टीका अनाठायी!

There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Bashar al-Assad
Bashar al-Assad: सीरियाचा नेता की क्रूर राजवटीचा चेहरा? बशर अल-असद कोण आहे?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Ajit Pawar on Mahavikas Aghadi MLA's Oath as a Maharashtra Legislative assembly Member
“मविआ आमदारांना उद्या शपथ घ्यावीच लागेल, अन्यथा…”, अजित पवारांचा इशारा
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे (ADA) महासंचालक पद जितेंद्र जाधव यांच्याकडे दिल्यामुळे भारतीय हवाई दलाची मागणी पूर्ण करून त्यांना वेळेत विमानांचा पुरवठा करण्याच्या कामात वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हलक्या वजनाची लढाऊ विमान निर्मिती (Light Combat Aircraft – LCA) हा भारताचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून बंगळुरूस्थित असलेल्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीकडे त्याची प्रमुख जबाबदारी आहे. एडीएचे मुख्यालय बंगळुरू येथे असून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही संस्था एडीएची प्रमुख भागीदार आहे.

हे वाचा >> लढाऊ तेजस विमान निर्मितीला वेग; उत्पादन क्षमता वर्षाला १६ ते २४ विमानांपर्यंत विस्तारणार, एचएएल नाशिक प्रकल्पातही तेजसची बांधणी

एडीए ही एक स्वायत्त संस्था असून भारताच्या संरक्षण मंत्रालयाने १९८४ रोजी याची स्थापना केली होती. हलक्या वजनाची लढाऊ विमाने तयार करणे आणि त्यात विकास करत जाण्यासाठी याची निर्मिती झाली होती. तेजस लढाऊ विमानाचा विकास केल्यानंतर आता एडीएकडून नवीन रचना, अधिक मारक क्षमतेचे तेजस एमके- २ हे लढाऊ विमान विकसित करीत आहे. आधुनिक रडार यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रासाठी उपकरणे सामावणाऱ्या तेजसची साडेसहा टन शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. हवेतून इंधन भरण्याच्या व्यवस्थेमुळे ते तीन हजार किलोमीटर पर्यंतचा पल्ला गाठू शकते.

जितेंद्र जाधव यांनी ११ सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला असून अडव्हान्स मिडियम कोम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) प्रकल्पाला गती देणे आणि २०२५ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत एमके-२ लढाऊ विमान तयार करण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर असेल.

हे ही वाचा >> हवाई दलाच्या ताफ्यात आता ‘एलसीए तेजस’, हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून सुपूर्द; वजनाने हलके दोन आसनी विमान

कोण आहेत जितेंद्र जाधव?

जितेंद्र जाधव यांचा जन्म १९ डिसेंबर १९६५ रोजी झाला. पुणे विद्यापीठातून त्यांनी १९८७ रोजी इलेक्ट्रॉनिक्सची पदवी मिळविली. एडीएच्या निवेदनानुसार जितेंद्र जाधव यांनी १९९९ साली शास्त्रज्ञ अभियंता म्हणून संस्थेत पाऊल ठेवले होते. तेव्हापासून एक उत्तम शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी आपले योगदान दिले आहे. त्यांच्याकडे लढाऊ विमान निर्मिती, नागरी वाहतूक विमान निर्मिती, वैमानिक प्रशिक्षण या कामाचा ३७ वर्षांचा अनुभव आहे. याबरोबरच तेजस लढाऊ विमानात शस्त्रास्त्र बसविणे, तांत्रिक विकास, डिस्प्ले संगणक आणि डिजिटल शस्त्रास्त्र व्यवस्थापन प्रणाली सारखे तंत्रज्ञानही त्यांनी विकसित केले आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाधव यांचे २० हून अधिक शोधनिबंध विविध प्रकाशनामध्ये छापून आलेले आहेत.

Story img Loader