जम्मू-काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात सोमवारी तीन भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. येथील हाफुर्डा जंगल आणि कुरसन लोलाब परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर या दोन्ही भागांमध्ये भारतीय लष्कराकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी हाफुर्डाच्या जंगलातील सैन्याच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी अचानकपणे गोळीबार सुरू केला. यामध्ये चार भारतीय जवान धारातीर्थी पडल्याची माहिती लष्कराचे प्रवक्त्यांकडून देण्यात आली. दरम्यान, हाफुर्डा आणि कुरसन परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही जोरदार चकमक सुरू आहे.

Story img Loader