J & K Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज जम्मू काश्मीरची दोडामध्ये सभा होणार आहे. भाजपाचे जम्मू काश्मीरचे निवडणूक ( J & K Elections ) प्रमुख जी. किशन रेड्डी म्हणाले की ४० वर्षांनी पंतप्रधानांची सभा दोडा मध्ये होते आहे. याआधी १९८२ मध्ये सभा झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार प्रचारक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसाठीचे ( J & K Elections ) भाजपाचे स्टार प्रचारक आहेत. आज दोडा या ठिकाणी असलेल्या मैदानावर सभा घेणार आहेत. जम्मू काश्मीरची निवडणूक ( J & K Elections ) जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिली सभा आहे. ३१ ऑगस्टला निवडणूक आयोगाने येथील निवडणुकीची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ सप्टेंबर रोजी श्रीनगरलाही भेट देणार आहेत.
जम्मू काश्मीर मध्ये तीन टप्प्यांत मतदान
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत विधानसभा निवडणूक ( J & K Elections ) पार पडणार आहे. १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांमध्ये ही निवडणूक ( J & K Elections ) होईल. पहिल्या टप्प्यात आठ मतदारसंघांसाठी निवडणूक ( J & K Elections ) होईल. हे मतदार संघ दोडा येथील तीन जिल्ह्यांमधले आहेत. तर काश्मीर येथील १६ जागांसाठीही याच दिवशी मतदान पार पडेल. भाजपाचे नेते गजय सिंग राणा यांनी दोडा येथून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर शक्ती राज परिहार हे दोडा पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत.
हे पण वाचा- “पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
कुरुक्षेत्र या ठिकाणीही होणार सभा
दोडा या ठिकाणी सभा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुरुक्षेत्र या ठिकाणी त्यांची पहिली सभा घेतील कारण पुढच्या महिन्यात हरियाणा येथे विधानसभा निवडणूक होणार आहे. हरियाणा येथील निवडणूक ५ ऑक्टोबरला पार पडणार आहे. तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर येथील निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा असल्याने दोडा या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी किश्तवर जिल्ह्यात अतिरेक्यांशी दोन हात करताना भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले तर इतर काही जण जखमी झाले. आज पार पडणाऱ्या सभेत पंतप्रधान काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
२०१९ मध्ये मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी अनुच्छेद ३७० रद्द केलं होतं. त्यानंतर या ठिकाणी म्हणजेच जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक पार पडते आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सभेत काय बोलणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd