जम्मू काश्मीरमधील भयंकर पुरस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आढावा घेतला.  यावेळी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यासह घेण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोदी यांनी अधिकाऱ्यांकडून येथील परिस्थितीची माहिती घेतली . नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून जम्मू-काश्मीरला एक हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीदेखील पिडीतांच्या मदतीसाठी ११०० कोटींची मदत जाहीर केली होती. 
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मिरात पुराने थैमान घातले असून आतापर्यंत १२० जणांना मृत्यू झाला आहे. झेलम, रावी, तावी, सिंधू आदी सर्वच प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहेत. सुमारे अडीच हजार गावांना या पुराचा तडाखा बसला असून गेल्या ६० वर्षांत प्रथमच काश्मीर खोऱ्याला अभूतपूर्व पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले होते. या दौऱ्यानंतर राज्याला हवी ती मदत पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. तर, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी नागरिकांना हवाई मार्गाने मदत पोहचविणार असल्याचे सांगितले आहे.  
 

Story img Loader