उत्तर काश्मीरमधील हंदवाडाजवळच्या विलगाम भागात बुधवार रात्रीपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवनांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत एक जवानही शहीद झाला.
निमलष्करी दल आणि पोलिसांच्या विशेष पथकाने सीमेपलीकडून काश्मीरमध्ये घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू केला होता. विलगामच्या जंगल परिसरात काही दहशतवादी दडून बसल्याची खातरजमा झाल्यानंतर जवानांनी या परिसरावर लक्ष केंद्रीत केले. शोधमोहिम सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यात एका जवानाचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरात भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात चार दहशतवादी ठार झाले. मात्र, पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप दोन दहशतवाद्यांचेच मृतदेह हाती लागले आहेत. सध्या चकमक थांबली असली तरी या परिसरात अतिरिक्त कुमक दाखल झाली असून शोधमोहिम अजूनही सुरूच आहे.
याआधी बुधवारी सोपोर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. तर एक दहशतवादीही मारला गेला होता.

Story img Loader