जम्मू-काश्मीरला आज (शनिवार) सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी मोजण्यात आली असून या भूकंपाचा केंद्रबिंदू किश्तीवारमध्ये होता. पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या या भूकंपाचे धक्के सुमारे नऊ सेकंद जाणविले.
प्राप्त माहितीनुसार, भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, शुक्रवारनंतर सलग दुसरा भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. किश्तवारसह काही भागांमध्ये घरांना तडेही गेले आहेत. तरी भूकंपामागचे कारण अद्याप कळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या भागात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मे महिन्यात या भागाला 37 भूकंपाचे धक्के बसले होते.
(संग्रहित छायाचित्र)
काश्मीरला भूकंपाचा धक्का
जम्मू-काश्मीरला आज (शनिवार) सकाळी भूकंपाचा धक्का बसला.
First published on: 03-08-2013 at 04:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jk magnitude 5 2 earthquake jolts kishtwar doda