झारखंडमधील भाजप सरकारचा झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) या पक्षाने पाठिंबा काढल्याने मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांचे सरकार संकटात सापडले आहे. गेले अडीच वर्ष भाजप येथे सत्तेवर आहे. पक्षाचे अध्यक्ष शिबू सोरेन यांनी राज्यपाल सय्यद अहमद यांना याबाबतचे पत्र पाठवून ही माहिती दिली.  तसेच झारखंडच्या कॅबिनेट बैठकीत झारखंड विधानसभा बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे झारखंडमध्ये राष्ट्रपतीची राजवट लागू होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील सहा-सात महिन्यात येथे पुन्हा नव्याने विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.   
अडीच वर्षापूर्वी झालेल्या झारखंड विधानसभा निवडणूकीत एकाही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी भाजपने सर्वांधिक २० जागी आणि झामुमोने १८ जागा जिंकून एकत्र येत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी दोन्ही पक्षाचा मुख्यमंत्री अडीच वर्ष राहिल अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, भाजपचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी सत्ता गेली तरी चालेल पण राजीनामा देणार नाही असा भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला आहे.

Story img Loader