JNU Electricity Cut : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये बीसीसीने प्रदर्शित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गुजरात दंगलीवरील माहितीपटाचं विशेष स्क्रीनिंग प्रयत्न करण्याचा करण्यात आला आहे. याच कारणामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ परिसरातील वीजपुरवठा खंडित केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने नुकतेच या माहितीपटाला यूट्यूब आणि ट्विटरवर बंदी घातलेली आहे.
हेही वाचा >>> पाकिस्तानातली बत्ती गुल, नेटीझन्स म्हणतायत भारताच्या गुप्तहेरांचं कारस्थान? नेमकं प्रकरण काय?
गुरुवारी केले जाणार होते स्पेशल स्क्रीनिंग
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी जेएनयू विद्यापीठ परिसरात जेएनयू स्टुडंट यूनियनने (JNUSU) बीबीसीने प्रदर्शित केलेल्या मोदी आणि गुजरात दंगलीवरील माहितीपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले जाईल, असे सांगितले होते. तशा आशयाचे पोस्टर्स सोमवारी झळकले होते. या पोस्टर्सनुसार गुरुवारी (२४ जानेवारी) रात्री ९ वाजता या माहितीपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केलं जाणार होते. या पोस्टरची चर्चा झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने हे स्क्रीनिंग करू नये, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.
हेही वाचा >>> ‘ठाकरे गट MIM शी युती करू शकतो’ म्हणणाऱ्या बावनकुळेंवर अंबादास दानवेंचे टीकास्र; म्हणाले, “तुम्ही आमच्या…”
माहितीपट पाहणे ऐच्छिक
मात्र विद्यापीठ प्रशासनाच्या इशाऱ्याला न जुमानता विद्यार्थी संघटनेने या माहितीपटाचे स्क्रीनिंग ठेवले होते. माहितीपटाच्या प्रदर्शनामागे कोणताही अनुचित प्रकार घडवण्याचा आमचा उद्देश नाही. माहितीपट पाहणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे. माहितीपट पाहणे ऐच्छिक असून ज्या विद्यार्थ्यांना तो पाहायचा आहे, तेच येथे येणार आहे, असे विद्यार्थी संघटनेकडून सांगण्यात आले होते.
हेही वाचा >>> शिवसेनेत बंड होणार याची कल्पना होती? संजय राऊतांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “पळून जाऊनच लग्न…”
परिसरात पोलीस तैनात
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने कारवाईचा इशारा देऊनही विद्यार्थी संघटनांनी या माहितीपटाचे स्क्रीनिंग आयोजित केल्यामुळे परिसरात पोलीस तैनात करण्यात आले होते. माहितीपटाचे स्क्रीनिंग होण्याआधीच विद्यापीठ प्रशासनाने या भागातील वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लिंक शेअर करत सर्वांनी एकत्र येत मोबाईलवर हा माहितीपट पाहावा, असे आवाहन केले. याच कारणामुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.